Rakhi Sawant's wild card entry  
बिग बॉस

Bigg Boss Marathi 6 : 'तन्वी कोलते बघ आता मी तुला कशी सोलते' म्हणत राखी सांवत नावाचे वादळ बिग बॉसच्या घरात...

‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. या पर्वातील पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतने जोरदार एंट्री घेतली असून, ओमकार राऊतच्या बाहेर पडण्यानंतर शोचं चित्रच बदललं आहे.

Published by : Riddhi Vanne

‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. या पर्वातील पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून राखी सावंतने जोरदार एंट्री घेतली असून, ओमकार राऊतच्या बाहेर पडण्यानंतर शोचं चित्रच बदललं आहे.

आतापर्यंत अनेक चढ-उतार अनुभवलेल्या या शोमध्ये आता खरी धमाल सुरू होणार असल्याचं स्पष्ट आहे. राखीच्या आगमनामुळे घरातील समीकरणे बदलणार, हे निश्चित मानलं जात आहे. प्रेक्षकांनीही यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत अभिजीत बिचूकलेलाही पुन्हा शोमध्ये आणण्याची मागणी केली आहे.

राखीच्या एंट्रीचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कॅप्टन सागरने तिला घरकामाबद्दल विचारल्यावर तिने दिलेलं उत्तर आणि अनुश्रीसोबत झालेला शाब्दिक वाद चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या हटके बोलण्याने घरात नाट्य रंगणार, याची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळते.

राखीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. काही जण ‘आता खरी मजा येणार’ असं म्हणत आहेत, तर काहींनी शो आणखी गोंधळात जाण्याची भीती व्यक्त केली आहे. एकूणच, राखी सावंतच्या एंट्रीमुळे ‘बिग बॉस मराठी ६’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

थोडक्यात

  1. बिग बॉस मराठी ६ मध्ये मोठा ट्विस्ट.

  2. राखी सावंत पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून जोरदार एंट्री.

  3. ओमकार राऊतच्या बाहेर पडण्यानंतर शोचं चित्र बदललं.

  4. आतापर्यंतच्या चढ-उतारानंतर खरी धमाल आता सुरू होणार.

  5. राखीच्या आगमनामुळे घरातील समीकरणे बदलणार.

  6. प्रेक्षकांनी अभिजीत बिचूकलेलाही पुन्हा शोमध्ये आणण्याची मागणी केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा